कोंबडीवरून झालेल्या वादात महिलांच्या मारहाणीत पीडितेचा गर्भपात

कोंबडीवरून झालेल्या वादात महिलांच्या मारहाणीत पीडितेचा गर्भपात

Published on

महिलांच्या मारहाणीत
पीडितेचा गर्भपात
भिवंडी, ता. २३ (वार्ताहर)ः भिवंडीतील शांतीनगर परिसरात कोंबडीवरून झालेल्या वादात तिघा महिलांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीनगर परिसरात मंगळवारी (ता. १७) रात्री आठ वाजताच्या सुमारास पीडित महिलेसोबत एका कोंबडीवरून वाद झाल्याने जोहरा बानो आणि इतर दोन महिलांनी पीडितेच्या पोटात लाथ मारली. त्यामुळे पीडितेच्या पोटात दुखून रक्त त्रास होऊन गर्भपात झाला. याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (ता. २१) दिलेल्या तक्रारीवरून, शांतीनगर पोलिसांनी जोहरा बानो आणि इतर दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com