शाहरूख, आर्यनविरोधात 
गुन्हा का दाखल नाही?

शाहरूख, आर्यनविरोधात गुन्हा का दाखल नाही?

Published on

कॉर्डेलिया क्रूझ लाच प्रकरण

शाहरुख, आर्यनविरोधात
गुन्हा का दाखल नाही?

उच्च न्यायालयात याचिका; अन्य प्रकरणांसोबत सुनावणी निश्चित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कॉर्डेलिया क्रूझ ५० लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, त्याचा मुलगा आर्यन खान, शाहरुखची व्यवस्थापक पूजा दादलानी यांच्यासह केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी), केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सोमवारी (ता. २३) करण्यात आली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित अन्य खटल्यांसोबत सुनावणी ठेवली आहे.

वकील राशिद खान पठाण यांनी केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले. त्या वेळी समीर वानखेडे आणि दिशा सालियन या संबंधित दोन प्रकरणांसोबत हे प्रकरणही ४ मार्चला सूचीबद्ध केले.
कॉर्डेलिया क्रूझ कथित लाच घेतल्याप्रकरणी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्यात आली. लाच देणाऱ्यांविरोधात कोणतीही गुन्हेगारी कारवाई करण्यात आलेली नाही. लाच देणेही भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा दावा पठाण यांनी याचिकेत केला आहे.

पारदर्शक चौकशी आवश्यक
सार्वजनिकरीत्या शाहरुख खान यांनी आपण कोणतीही लाच दिली नसल्याचे म्हटले आहे. जर लाच दिलीच नसेल, तर लाच घेतल्याच्या आरोपावरून समीर वानखेडेंविरोधात गुन्हा कसा नोंदवला? लाच देण्याच्या गुन्ह्यासाठी शाहरुख यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?  असे प्रश्न याचिकेत उपस्थित केले आहेत.  या पार्श्वभूमीवर प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणीही याचिकेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com