भिवंडीत गाडीच्या धडकेने दुचाकी चालकाचा मृत्यू
गाडीच्या धडकेने
दुचाकीचालकाचा मृत्यू
भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडीमध्ये अज्ञात चारचाकीची धडक लागल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा दीर्घ उपचारानंतर आज मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकीचा चालक घटनास्थळावरून पळून गेल्याने भिवंडी शहर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादवड गावातील अटलांटा टॉवर परिसरातील रहिवासी रोहित खैरनार (२८) हा १६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री त्याच्या दुचाकीवरून भिवंडीहून कल्याणला जात होता. कल्याणनाका पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव गाडीने त्याच्या दुचाकीला धडक दिली तेव्हा रोहित त्याच्या दुचाकीसह पुलाच्या दुभाजकाला धडकला आणि खाली रस्त्यावर पडला. त्याच्या खांद्याला, दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आणि छातीला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या रोहितला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भिवंडी शहर पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

