बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव बिनविरोध
बेस्ट समिती अध्यक्षपदी
तृष्णा विश्वासराव बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैकी एक असलेल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या तृष्णा विश्वासराव यांची आज बिनविरोध निवड झाली.
बिनविरोध निवडीची घाेषणा महापौर रितू तावडे यांनी केली. बेस्ट समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणीही महिला अध्यक्ष झालेली नव्हती. मुंबई महापालिकेत आणि बेस्टमध्येदेखील सलग २५ वर्षे सत्ता असूनही शिवसेनेने कधीही बेस्ट समितीवर महिला नगरसेवकांना अध्यक्षपदाची संधी दिली नव्हती. तृष्णा विश्वासराव यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नगरसेवक पदाची कामगिरी लक्षात घेत त्यांना संधी दिली आहे. भाजपचे गटनेते व पालिका सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

