कर्जत तुंगी येथील तलावात १२ वर्षीय ओंकारचा बुडून मृत्यू

कर्जत तुंगी येथील तलावात १२ वर्षीय ओंकारचा बुडून मृत्यू

Published on

१२ वर्षीय बालकाचा
तलावात बुडून मृत्यू
कर्जत, ता. २३ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तुंगी गावात तलावात बुडून १२ वर्षीय ओंकार उर्फ मुक्या भरत आसवले या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २१) घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.
गावालगत असलेल्या तलावाजवळ शनिवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास ओंकार गेला होता. तलावाजवळील निसरडी पायवाट तसेच कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नसल्यामुळे तो पाण्यात पडून बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत ओंकार घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर रविवारी (ता. २२) सकाळी तलावातच त्याचा मृतदेह आढळून आला.
अलीकडेच शासनाच्या माध्यमातून गावात रस्ता व वीज पोहोचली असून, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षे असलेल्या तलावात जलजीवन मिशन अंतर्गत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सध्या या तलावात सुमारे १५ फूट पाणी साचलेले असून, खोदकामाचे कामही सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीमुळेच निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com