ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे निधन .

ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे निधन .

Published on

ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे निधन
मुंबई ः रंगभूमीबरोबरच चित्रपटांत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निलांबरी महादेव खामकर (वय ८०) यांचे आज रात्री आठच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. २४) भोईवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चार दिवस सासूचे, जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, महेश कोठारे निर्मित माझी माणसे अशा अनेक मालिकांमध्ये तसेच सिंड्रेला, पेन्शन, धर्मवीर २ अशा काही चित्रपटांत त्यांनी काम केले. इंडिया युनायटेड मिल (एनटीसी) मध्ये कार्यरत असताना पार्श्वनाथ आळतेकर नाट्य स्पर्धा, आंतर गिरणी नाट्य स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा अशा प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या अनेक नाट्य स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दादर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com