माझी वसुंधरा अभियानात प्राप्त झालेला पुरस्कार ही अभिमानास्पद बाब

माझी वसुंधरा अभियानात प्राप्त झालेला पुरस्कार ही अभिमानास्पद बाब

Published on

महापौरांच्या हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
‘माझी वसुंधरा’ अभियानात कल्याण-डोंबिवली पालिकेला दीड कोटींचा पुरस्कार

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’अंतर्गत अमृत गटात कोकण विभागीय स्तरावर कल्याण-डोंबिवली महापालिकेला दीड कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही बाब शहरासाठी अत्यंत भूषणावह असल्याचे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले. या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कोकण विभागीय स्तरावर अमृत गटात दीड कोटी रुपयांचा रोख पुरस्कार मिळाला आहे. महापालिकेला ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारतर्फे गौरविण्यात आले. राज्यातील ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केडीएमसीने आपली मोहर उमटवली.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या पुरस्काराला चांगल्या कामाची पोचपावती म्हटले. मात्र शहरापुढील कचरा समस्येवर बोट ठेवत त्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. कचरा विलगीकरण ही काळाची गरज आहे. गृहसंकुले, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कचरा व्यवस्थापनाबाबत व्यापक जनजागृती करावी, असे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमात उपमहापौर राहुल दामले आणि विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत अभियानासाठी परिश्रम घेणाऱ्या टीमचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त समीर भुमकर (पर्यावरण), रामदास कोकरे (घनकचरा), अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत (विद्युत) व जगदीश कोरे (जनि:मनि:), माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आणि सोशल मीडिया टीमचे उमेश यमगर यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त समीर भुमकर यांनी केले. तर सूत्रसंचालन महापालिका सचिव किशोर शेळके यांनी केले. या वेळी गटनेते विश्वनाथ राणे, शशिकांत कांबळे, कांचन कुलकर्णी, रमीज मनीयार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com