सार्वजनिक शौचालये दुर्गंधींची केंद्रे
सार्वजनिक शौचालये दुर्गंधीची केंद्रे
वापराबाबत जनजागृतीच्या अभावामुळे फटका
जव्हार, ता. २३ (बातमीदार)ः जव्हार तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानानंतर मोठ्या प्रमाणात शौचालयांची उभारणी करण्यात आली. अनेक गावांनी दुर्गंधीमुक्तीचा दर्जाही मिळवला; मात्र वापराबाबत जनजागृती नसल्याने शौचालये दुर्गंधींची केंद्रे बनली आहेत.
जव्हार शहर गावपातळीवर शौचालय वापर तपासणी, जनजागृती मोहीम, दंडात्मक कारवाईची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. स्वच्छता दूत, आशा कार्यकर्त्या व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वापराची सवय दृढ करणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो रुपयांचा निधी वाया जाऊन स्वच्छतेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. शहरातील सनसेट पॉइंट परिसर, हनुमान पॉइंट स्मशानभूमी परिसर, बस स्थानक मागील बाजू परिसरात नागरिक उघड्यावर लघुशंका तसेच शौचास जात आहेत. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जव्हार नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने वेळीच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त केली आहेत.
-------------------------------------------
अभियानाच्या उद्देशाला हरताळ
- स्वच्छता अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे आरोग्य सुधारणा, पर्यावरण संरक्षण आणि महिलांच्या सन्मानाचे रक्षण हा होता, परंतु अंमलबजावणीत सातत्य नसल्याने आणि वापराविषयी जागरूकतेचा अभाव असल्याने अपेक्षित परिणाम साध्य होताना दिसत नाहीत.
- शासनाकडून अनुदान मिळवून बांधलेली शौचालये आता वापराऐवजी बंदच ठेवली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही ठिकाणी पाण्याची कमतरता, देखभालीचा अभाव, जनजागृतीच्या कमतरतेमुळे नागरिक पुन्हा उघड्यावर शौचास जात असल्याची बाब उघड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

