घोणसईतील लोखंड कारखाना वादात
घोणसईतील लोखंड कारखाना वादात
परवानगीशिवाय काम सुरू केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
वाडा, ता. २४ (बातमीदार)ः तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील लोखंडनिर्मितीचा कारखाना सुरू होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या कारखान्यामुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषणात वाढ होणार असल्याचा आरोप करताना परवानगीशिवाय सुरू असलेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.
घोणसईतील लोखंड कारखान्यात आय बीम, टोर, सळया, एंगल्स, प्लेट, पाइप, टीएमटी आदी साहित्याचे उत्पादन करण्यात येणार आहे. या कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने ग्रामसभेत संबंधित कंपनीला परवानगी किंवा ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला दिला आहे का, असा प्रश्न ग्रामस्थ विकास घरत यांनी उपस्थित केला होता. या वेळी ग्रामसभा संपताच ग्रामस्थांनी कंपनीच्या जागेवर जाऊन सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.
-----------------------
नोंदवलेले आक्षेप
-लोखंड बनवणारा कारखाना लोकवस्ती लगत असल्याने वायू, ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. तसेच कंपनीच्या मध्यभागी जागेतून अति उच्च दाबाची वाहिनी गेली असून, एखादा अपघात झाल्यास जीवितहानी होणार आहे.
- गावात पाण्याचे दुर्भिक्ष असताना कंपनीला लाखो लिटर पाणी लागणार आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई जाणवणार आहे. घोणसई मेट रस्ता हा साडेतीन मीटर रुंदीचा असताना अवजड वाहने ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागणार आहे
------------------------------
कंपनीने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसताना बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेत तक्रारी उपस्थित केल्याने ग्रामपंचायत कमिटीने सुरू असलेले बांधकाम बंद पाडले आहे.
- शैला जाबर, सरपंच, ग्रामपंचायत घोणसई मेट
---------------------------
लोकवस्तीलगत सदर कारखान्याचे बांधकाम सुरू असल्याने कंपनीच्या ध्वनी, वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे या कारखान्याला विरोध आहे.
- हर्षद घोडविंदे, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

