१० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित

१० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित

Published on

दहावीच्या परीक्षेदरम्यान वीज गुल
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार
कल्याण, ता. २४ : इयत्ता दहावीच्या पहिल्याच लेखी पेपरला कल्याणमधील अनेक शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना उकाडा आणि अंधाराचा सामना करावा लागला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने शिक्षण विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी (ता. २०) दहावीचा पहिला पेपर सुरू असताना सकाळी ११:३०च्या सुमारास कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील अनेक शाळांची वीज अचानक खंडित झाली. भरउन्हाळ्यात पंखे आणि लाईट बंद झाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड उकाडा आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागला. शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षेत अशा प्रकारच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर आणि मानसिकतेवर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी शिष्टमंडळासह कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. वीज गेल्यास शाळांनी इन्व्हर्टर किंवा जनरेटरची पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवावी. वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. उर्वरित परीक्षेच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यार्थी वर्षभर कष्ट करून परीक्षेची तयारी करतात. त्यांना योग्य वातावरण देणे प्रशासनाचे काम आहे. अशा निष्काळजीमुळे मुलांचे नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी दिली. या वेळी भानुदास घुगे, दिनेश मढवी, प्रेमनाथ मढवी, मजरखान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com