

स्वच्छ जल, मन अभियानाला प्रतिसाद
कासा (बातमीदार) ः संत निरंकारी मिशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट अमृतच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानांतर्गत डहाणू तालुक्यात व्यापक स्वच्छता, जनजागृती मोहीम उत्साहात पार पडली. माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनात देशभरात १,५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली. जलसंवर्धनाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले. डहाणू, आंबेसरी, हळदपाडा, सायवन, चारोटी आणि ऐना शाखांतील स्वयंसेवकांनी नदी-नाल्यांची स्वच्छता, जलस्रोत परिसरातील साचलेला कचरा हटवणे, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उपक्रम राबविले. लुप्त होण्याच्या मार्गावरील पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण काळाची गरज असल्याचा संदेश या वेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.