नवे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित

नवे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित

Published on

नवे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित
लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांना फायदा

​कल्याण, ता. २४ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे. कल्याण पूर्वेतील ४/जे प्रभाग कार्यालयात उभारण्यात आलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन नुकतेच पार पडले. या केंद्रामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी या वेळी केले.

उद्‍घाटन सोहळ्याला संस्थेचे महासंचालक जयराज फाटक, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, वित्त अधिकारी देवर्षी पंडा, नाशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक जीवन सोनावणे आणि कल्याण केंद्राचे प्रादेशिक संचालक मारुती खोडके यांच्यासह अनेक नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

​प्रशिक्षण केंद्राच्या गरजेवर भाष्य करताना महासंचालक जयराज फाटक म्हणाले, की सध्या मुंबई आणि नवी मुंबईत प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेता कल्याणमध्ये विभागीय केंद्राची नितांत आवश्यकता होती. हे केंद्र आता सर्व विभागांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यास सज्ज आहे. हे महाराष्ट्रातील संस्थेचे नववे केंद्र आहे. याचा फायदा केवळ कल्याण-डोंबिवलीलाच नाही, तर आजूबाजूच्या इतर महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनाही होईल, असा आशावाद आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला. ​या केंद्राच्या माध्यमातून भविष्यात स्थानिक प्रशासनाचा दर्जा सुधारण्यास आणि नागरिकांना अधिक सक्षम सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षण केंद्राची माहिती
केंद्रासाठी ५५४ चौ.मी. इतकी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था पदविका, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि महत्त्वाचे तांत्रिक व प्रशासकीय कोर्सेस लवकरच सुरू होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com