गावठी बोरांचा हंगाम संकटात

गावठी बोरांचा हंगाम संकटात

Published on

गावठी बोरांचा हंगाम संकटात
विक्रमगड परिसरातील विकासकामांमुळे झाडांचे प्रमाण घटले
विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यात गावठी बोरांचा हंगाम सुरू झाला आहे; मात्र विकासकामे आणि बदलत्या हवामानामुळे पारंपरिक बोराचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे झाडांचे घटलेले प्रमाण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
तालुक्यातील साखरे, दादडे, झडपोली, चिंचघर, तलवाडा, मलवाडा तसेच डोंगरपाड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणारी गावठी बोरांची झाडे फळांनी बहरली आहेत. थंड हवामानामुळे बोरांचा आकार, गोडी, दर्जा चांगला आहे; मात्र गेल्या काही वर्षांत रस्ते रुंदीकरण, वीजवाहिन्या, घर बांधकामे तसेच शेती विस्तारासाठी झाडांची तोड वाढली आहे. त्यामुळे लहान-मोठी झाडे नष्ट झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, बोराची झाडे नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने एकदा तोडलेल्या झाडाची पुनर्निर्मिती हळूहळू होत असल्याने पर्यावरण अभ्यासकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
---------------------------
संवर्धन गरजेचे
- बोराची झाडे केवळ फळ देणारी नसून पक्षी, लहान प्राणी तसेच कीटकांसाठी अन्नाचा स्रोत आहेत. त्यामुळे घटत्या संख्येमुळे स्थानिक अन्नसाखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच गावठी बोरे अनेक कुटुंबांसाठी हंगामी उत्पन्नाचा आधार आहे.
- झाडांचे घटते प्रमाण हा पर्यावरणीय समतोलासाठी इशारा आहे. हवामान बदल, वाढती जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वृक्षसंपत्तीचे जतन करणे अत्यावश्यक आहे. शासन, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com