वसई-विरार पालिकेत सत्ताधाऱ्यांना आव्हान

वसई-विरार पालिकेत सत्ताधाऱ्यांना आव्हान

Published on

वसई-विरार पालिकेत सत्ताधाऱ्यांना आव्हान
विरोधी बाकावर आक्रमक चेहरे
वसई, ता. २४ (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिकेवर भाजपचे विरोधी पक्षनेता, गटनेता आणि स्थायी समितीवर सदस्य म्हणून निवडून गेलेले तीन चेहरे आक्रमक आहेत. त्यामुळे महासभा, स्थायी सभेत मंजुरीसाठीच्या विषयांवरून विरोधकांचे तगडे आव्हान असणार आहे.
वसई-विरार महापालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून मनोज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी महापालिकेशी निगडित अनेक विषयांना त्यांनी समोर आणले आहे. त्यात विशेषकरून अतिक्रमणसारख्या समस्येबरोबर आरक्षणाचा फायदा सर्वसामान्यांना करून देताना आक्रमक पवित्रा घेत पालिका प्रशासनाला घेरले होते. प्रशासकीय राजवटीत मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने आरक्षित जागांचा मुद्दा गाजला होता. दुसरीकडे भाजपने गटनेता म्हणून अशोक शेळके यांची निवड केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोमाने काम केले होते. प्रशासकीय कामे झाली पाहिजेत, यासाठी त्यांचा आक्रमकपणा दिसून आला आहे. तसेच वसईतील महेश सरवणकर यांनीही मूलभूत नागरी समस्यांपासून विकासाच्या निकृष्ट दर्जाबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. सरवणकर यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली असल्याने स्थायी तसेच महासभेत नियोजनबद्ध विकासावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी कसब पणाला लावणार यात काही शंका नाही. त्यामुळे शहराच्या विकासासाठी नियोजन करताना सत्ताधारी विरोधकांना कसे हाताळतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
-------------------
नगरसेवकांची भूमिका निर्णायक
बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे नगरसेवक पालिकेत असल्याने जनतेला विकासाची अपेक्षा दोघांकडून असणार आहे. त्यामुळे विरोधी कामावरील सत्तेतील नगरसेवकांची भूमिका शहरातील विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com