मुंबईतील व्यापाऱ्याची नालासोपाऱ्यात फसवणूक
व्यापाऱ्याची जमीनप्रकरणी फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा
विरार, ता. २४ (बातमीदार) : बोरिवली येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यापाऱ्याची जमीन व्यवहारात नालासोपारा परिसरात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाणे यांनी सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मोहम्मद अस्लम कुरेशी यांच्या मालकीच्या सोपारा परिसरातील सर्व्हे क्रमांक १२ (हिस्सा क्र. ६- क्षेत्र ४.८ गुंठे), सर्व्हे क्रमांक १२ (हिस्सा क्र. ४/ब/१ – क्षेत्र ९ गुंठे) तसेच सर्व्हे क्रमांक २९/ब (क्षेत्र १३.५ गुंठे) या जमिनीबाबत २००७ पासून संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार इम्तियाज बोटके, निसार बोटके, राजेश नाईक, अहमद अब्दुल कादिर फौकत, अम्मार अब्दुल कादिर फौकत आणि मोहम्मद सिद्दीकी पुंजानी यांनी विकास करारनाम्याच्या आधारे जमीन ताब्यात घेतल्याचा भास निर्माण करून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मालकी हक्क दाखवला. तसेच तक्रारदारांच्या आईचे विकासहक्क न घेता करण्यात आलेल्या कराराचा दाखला देत वसई-विरार शहर महापालिकेकडून मालमत्ता कर पावती मिळविल्याचा आरोप आहे.
तसेच संबंधित जमिनीतील विकासहक्क परस्पर विक्री करताना तक्रारदारांच्या पालकांना विश्वासात न घेता व्यवहार केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी जमिनीवर बेकायदेशीरपणे मातीचा भराव टाकल्याचा आरोप असून, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदारांनी जाब विचारल्यावर त्यांना जागेवरून हुसकावून लावत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), १२६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

