इयत्ता तिसरीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातील मजकुराबाबत महापौरांकडे तक्रार
इयत्ता तिसरीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातील मजकुराबाबत महापौरांकडे तक्रार
तत्काळ चौकशीचे निर्देश
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : इयत्ता तिसरीच्या आयसीएसई हिंदी पाठ्यपुस्तकातील ‘जल्दबाज़ी ठीक नहीं’ या धड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिशाभूल करणारा उल्लेख असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय लोकदल पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. वेदप्रकाश तिवारी यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली.
या वेळी डॉ. तिवारी यांनी संबंधित धड्यातील मजकूर ऐतिहासिकदृष्ट्या अपूर्ण असून, विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा समज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. प्राथमिक स्तरावर इतिहासाची अचूक आणि संतुलित मांडणी होणे आवश्यक असल्याने या मजकुराची तत्काळ दुरुस्ती करावी किंवा संबंधित धडा वगळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. महापौर तावडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत ऐतिहासिक सत्यतेचे जतन केले जाईल व आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

