अंबरनाथ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प वादात

अंबरनाथ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प वादात

Published on

अंबरनाथ नगर परिषदेचा अर्थसंकल्प वादात
शिवसेना-भाजप आमनेसामने; आठ तासांनंतर सभा तहकूब!
अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे ७४० कोटी ९० लाख ९२० रुपयांचे प्रस्तावित अंदाजपत्रक सोमवारी सादर करण्यात आले. मात्र, विकासाच्या मुद्द्यांपेक्षा सत्ताधारी शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधील तीव्र संघर्षामुळे ही सभा वादळी ठरली. तब्बल आठ तास चाललेला गोंधळ न थांबल्याने अखेर सभा तहकूब करावी लागली.

मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प मांडला. मात्र, प्रभागनिहाय निधीवाटप, रस्ते विकास आणि प्रशासकीय खर्चावरून दोन्ही गटांत जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. विशेषतः १५० कोटींच्या विशेष अनुदानावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. अखेर रात्री उशिरापर्यंत एकमत न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली.

सभेत कोहोज गावातील आठवडा बाजाराचा मुद्दा निघताच वातावरण अधिकच तापले. शिवसेनेचे विकास सोमेश्वर यांनी हा बाजार बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. याला प्रत्युत्तर देताना नगरसेवक प्रदीप पाटील व उमेश पाटील यांनी सांगितले की, हा बाजार नागरिकांच्या सुविधेसाठी आहे. जर कारवाई करायची असेल, तर शहरातील सर्वच अनधिकृत बाजारांवर समान कारवाई व्हावी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. नियमानुसार २८ फेब्रुवारीपूर्वी अंदाजपत्रक मंजूर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर होणार की वादाचा ‘दुसरा अंक’ रंगणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पाचा लेखाजोखा :
एकूण उत्पन्न : ७४० कोटी ९० लाख ९२० रुपये.
अपेक्षित खर्च : ७३९ कोटी ५८ लाख ६२ हजार ६०० रुपये.
अपेक्षित शिल्लक : ४२ लाख २८ हजार रुपये.
जमेची बाजू : नागरिकांवर कोणतीही नवीन कर वाढ लादण्यात आलेली नाही.

प्रमुख तरतुदी
विभाग तरतूद (कोटीमध्ये)
शिक्षण विभाग १६ कोटी १६ लाख
घनकचरा व्यवस्थापन १८ कोटी
दिव्यांग/महिला-बाल कल्याण प्रत्येकी ४ कोटी
विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान १५० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com