नायगावचा कायापालट होणार

नायगावचा कायापालट होणार

Published on

नायगावात विकासकामांना गती
महापौरांचे चांगल्या रस्त्यांसह क्रीडा संकुल आणि कचराकोंडीवर उपाययोजनांचे आश्वासन

विरार, ता. २४ (बातमीदार) : नायगाव पूर्व आणि टिवरी परिसरातील प्रलंबित विकासकामे, कचरा समस्या आणि नागरी सुविधांच्या मागणीसाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नगरसेवक कन्हया भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडी आणि साई दुर्गा मित्रमंडळाचे अध्यक्ष चेतन घरत यांनी वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान परिसरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापौरांनी आगामी महासभेत यातील महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
चेतन घरत यांनी महापौरांकडे सादर केलेल्या निवेदनात टिवरीफाटा ते भोयदापाडा या २६ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम व गटार बांधणी तातडीने सुरू करावी. तसेच परेरानगरमधील नऊ एकर जागेत सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाला गती देऊन नवीन निविदा काढण्याची मागणी करण्यात आली. सनटेक, ग्लोबल नक्षत्र आणि पवित्र धाम संकुलामधील कचरा संकलन पालिकेने पुन्हा सुरू करावे. वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नायगाव पूर्व भागात औषध व धूर फवारणी नियमित करावी, अशी मागणीही करण्यात आली. जूचंद्र आणि परेरानगर परिसरातील जुने पिवळे सोडियम दिवे बदलून त्याऐवजी आधुनिक एलईडी दिवे बसवावेत. उद्यान आणि स्मशानभूमी परिसरातही प्रकाशव्यवस्था सुधारण्याची गरज या वेळी व्यक्त केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करताना महापौर अजीव पाटील यांनी सांगितले, की नायगावच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध आहे. निवेदनातील महत्त्वाच्या कामांचा आढावा घेऊन येणाऱ्या महासभेत त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल. महापौरांच्या भेटी वेळी बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्वचे शिष्टमंडळ, चेतन घरत, आशीष पाटील, मनोज पाटील, चेतक पाटील, संकेश पाटील, रोहन पाटील उपस्थित होते.
------
अन्य मागण्या
नायगाव स्टेशन ते सनटेक सिटीदरम्यान दोन नवीन इलेक्ट्रिक बसेस सुरू कराव्यात. तसेच परिसरात अग्निशमन केंद्राचे प्रपोजल मंजूर करून काम सुरू करावे. पावसाळ्यापूर्वी परेरानगरमधील ड्रेनेजच्या आऊटलेटला नवीन झडपा बसवाव्यात आणि उघड्या गटारांवर स्लॅब टाकून दुर्घटना टाळाव्यात. वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीचे दर कमी करावेत. तसेच विधवा पेन्शन व महिला बालकल्याण योजनांसाठी जूचंद्र विभागात विशेष शिबिरांचे आयोजन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com