मेलजोल संस्थेचा करिअर फेअर मार्गदर्शन

मेलजोल संस्थेचा करिअर फेअर मार्गदर्शन

Published on

करिअर फेअर मार्गदर्शन

जव्हार (बातमीदार) : ग्रामीण आदिवासी भागातील युवकांना शिक्षण व करिअरविषयक योग्य दिशा मिळावी, रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता वडोली येथे मेलजोल संस्थेच्या वतीने हिरा गांधी हायस्कूल, येथे शनिवारी (ता. २१) करिअर फेअरचे आयोजन करण्यात आले होते. यात ३५० युवकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंकजा उपस्थित होत्या. तसेच आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, प्रा. मुरबे आणि सरपंच कामिनी गावंढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन, चिकाटी व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या करिअर फेअरमध्ये कृषी, शिक्षण, नर्सिंग, आयटीआय, संगणक अभ्यासक्रम, सरळ सेवा भरती अकादमी, स्किल सेंटर आदी क्षेत्रांशी संबंधित एकूण आठ स्टॉल्स उभारण्यात आले होते. विविध अभ्यासक्रमांची माहिती, प्रवेश प्रक्रिया आणि रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com