मालाड पश्चिमेत उद्यानात गटारपाणी, कचऱ्याचा सडा

मालाड पश्चिमेत उद्यानात गटारपाणी, कचऱ्याचा सडा
Published on

मालाड पश्चिमेत उद्यानात गटारपाणी, कचऱ्याचा सडा
सुरक्षा रक्षकांचा अभाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मालाड, ता. २३ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील गेट क्र. ७, आझमी नगर, प्रभाग क्रमांक ३३ येथील अल्लामा शिबली मोमणी उद्यान सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्यानात गटाराचे पाणी साचलेले असून, मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.
स्वच्छतेअभावी डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानात जाणे धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच काही नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमार्फत उद्यान परिसरात अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांनी व ज्येष्ठांनी उद्यानात जाणे टाळले आहे. उद्यान हे विश्रांती, व्यायाम आणि मुलांच्या खेळासाठी महत्त्वाचे ठिकाण असतानाही सध्याच्या परिस्थितीत त्याचा उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहेत मागण्या?
उद्यानाचे तातडीने नूतनीकरण करावे, साचलेल्या पाण्याचा निचरा करून परिसराची संपूर्ण स्वच्छता करावी, नियमित साफसफाईची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमावा, आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

स्‍वाक्षरी मोहीम
आम आदमी पक्षाच्या वतीने उद्यानाच्या नूतनीकरणासाठी व स्वच्छतेसाठी तसेच अनधिकृत वाहन पार्किंगविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे पदाधिकारी लारझी व्हर्गिस यांनी दिली. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबत लेखी तक्रार देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

सुरक्षा रक्षक नाहीत
उद्यानाच्या प्रवेशद्वारावर शुल्क आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उद्यानाची संरक्षण भिंत तुटलेली असून, खेळण्याचे साहित्य गायब झाले आहे. लोखंडी दरवाजाही तुटून पडला आहे. पूर्वी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षक नेमले होते; मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरक्षा रक्षक दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वॉर्ड क्रमांक ३३ मधील आझमी नगरवासीयांसाठी हे एकमेव उद्यान असूनही त्याची अशी अवस्था झाल्याबद्दल नागरिकांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com