जुन्या वादातून भिवंडीत बेदम मारहाण

जुन्या वादातून भिवंडीत बेदम मारहाण

Published on

भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार दिल्याच्या जुन्या वादातून भिवंडीतील पालिका प्रभाग समिती क्रमांक ४ कार्यालयाच्या प्रांगणात एका व्यक्तीला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोहम्मद मन्सूर अन्सारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मन्सूर अन्सारी हे तक्रार अर्ज देण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात गेले असता तेथे उपस्थित असलेल्या नियाज सिद्दिकी, फिरोज मेमन, कासिम सिद्दिकी, अली व एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी त्यांना दुचाकीवरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जीव वाचवण्यासाठी अन्सारी यांनी जवळील पालिका कॅबिनमध्ये आसरा घेतला. जखमी अवस्थेत कुटुंबीयांच्या मदतीने त्यांना स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी सायंकाळी उशिरा अन्सारी यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाणे येथे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नियाज सिद्दिकी याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?
अन्सारी यांनी नियाज सिद्दिकी यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार दिल्याने काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यापूर्वीही मारहाणी व महिलांच्या विनयभंगाच्या आरोपांबाबत गुन्हा दाखल झाला होता; मात्र त्या वेळी अटक झाली नसल्याचा अन्सारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com