*मैत्री चषक २०२६ रायगड दिव्यांग संघ विजेता तर नवी मुबंई उपविजेता*

*मैत्री चषक २०२६ रायगड दिव्यांग संघ विजेता तर नवी मुबंई उपविजेता*

Published on

मैत्री चषक रायगड दिव्यांग संघ विजेता
तळा (प्रतिनिधी) ः कुलाबा दिव्यांग सोशल फाउंडेशन इंडिया व कुलाबा दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवारी (ता. २२) मैत्री चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा मोहपाडा येथील एनआयएसएम मैदानात खेळवण्यात आल्या. यामध्ये मुंबई, रायगड, नवी मुंबई, ठाणे या चार संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच संदीप मुंढे, रोटरी क्लब ऑफ इंडिया अध्यक्ष राकेश वर्तक, क्रीडा संचालक सुनील भोसले, संचालक नागेश कदम यांनी केले. या स्पर्धेत रायगड संघ विजेता तर नवी मुंबई उपविजेता ठरले. या स्पर्धेचे आयोजन कुलाबा दिव्यांग फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष शशांक हिरवे, कार्याध्यक्ष तथा सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, सचिव सुनील पाटील, खजिनदार अरुण घोडके, स्वामीज्ञ फाउंडेशनचे अध्यक्ष अंजली घोडके, कल्पेश तवले, मंगेश पारटे, नागनाथ घोडके, रूपेश पवार, चंद्रकांत पवार, रवी भोईर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com