खैराट येथे जल अर्पण सोहळा उत्साहात

खैराट येथे जल अर्पण सोहळा उत्साहात

Published on

खैराट येथे जल अर्पण सोहळा उत्साहात
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग तळा यांचा उपक्रम; जलसंवर्धनाचा संदेश
तळा, ता. २४, (बातमीदार) : ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग तळा यांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द अंतर्गत मौजे खैराट येथे जलजीवन मिशन अंतर्गत ‘जल अर्पण सोहळा’ सोमवारी (ता. २३) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पाण्याच्या टाकीजवळ विधिवत कलश पूजनाने झाली. या वेळी शाळेतील विद्यार्थी, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ‘जल है तो कल है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर प्रभात फेरी काढून जनजागृती केली. अंगणवाडी सेविकांनी पाण्याची गुणवत्ता तपासणी करून सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत मार्गदर्शन केले. डेप्युटी इंजिनिअर मा. एकनाथ कोठेकर व ज्युनिअर इंजिनिअर अमृता कांबळे यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. सरपंच प्रविण आंबार्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध मान्यवर व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com