सोनसडे येथे होळीच्या पहिल्या पिल्ल्याची पंचमीदिनी पारंपरिक सुरूवात

सोनसडे येथे होळीच्या पहिल्या पिल्ल्याची पंचमीदिनी पारंपरिक सुरूवात

Published on

सोनसडे येथे होळीच्या पहिल्या पिल्ल्याची पंचमीदिनी पारंपरिक सुरूवात
ग्रामदेवतांच्या जयघोषात गीतगायन; आबालवृद्धांची उत्स्फूर्त उपस्थिती
तळा, ता. २४ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात शिमगोत्सवाची चाहूल लागल्याने गावागावांत होळीच्या पहिल्या पिल्ल्याची पंचमीदिनी सुरूवात करण्यात आली. सोनसडे येथे हा सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि पारंपरिक जल्लोषात पार पडला. गावकऱ्यांनी पहिल्या मानाचे पिल्लू लावत होळी उभी केली. त्यानंतर हातात अक्षता घेऊन ग्रामदेवतेच्या नावाने फेरी मारत पारंपरिक गीतगायन करण्यात आले. ‘होळी रे होळी जशी शिमग्याची पोळी, हे पालखी कोण देव बसे’ अशा गजरात वातावरण दुमदुमले.
यावेळी श्री काळभैरव, जोगेश्वरी, बापुजी, महादेव, धाकसुद, कालीकामाता, कृष्णाई, कान्हाई, वेताळ आदी देवतांची नावे घेत सर्व देवता शिमगा खेळण्यासाठी एकत्र येतात, अशी भावपूर्ण साद घालण्यात आली. तरुण युवक, महिला व आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळीच्या अंगाऱ्याचे पूजन करून तो घरी नेण्याची परंपरा जपण्यात आली. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com