जिल्हा निवड चाचणीत जय बजरंग रोहाला तिसरा क्रमांक
जिल्हा निवड चाचणीत जय बजरंग रोहाला तिसरा क्रमांक
राकेश गायकवाड-राज मोरे यांचा अष्टपैलू खेळ; रोहा तालुक्याच्या कबड्डी इतिहासात नवे पर्व
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघाने दमदार कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील बलाढ्य संघांच्या सहभागात झालेल्या या स्पर्धेत रोहा संघाने सुरुवातीपासूनच जिद्द, शिस्त आणि लढाऊ वृत्तीचा खेळ सादर करत उपांत्य फेरीत धडक मारली. या यशामुळे रोहा तालुक्याचा क्रीडाक्षेत्रातील मान उंचावला आहे.
स्पर्धेतील प्रत्येक फेरीत प्रभावी बचाव, अचूक चढाया आणि उत्कृष्ट संघसमन्वयाच्या जोरावर जय बजरंग रोहाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. अष्टपैलू खेळाडू राकेश गायकवाड व राज मोरे यांच्या उल्लेखनीय खेळामुळे निर्णायक क्षणी संघाला आघाडी मिळाली. प्रशिक्षक अमर सलागरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी शिस्तबद्ध आणि संघभावनेने खेळ करत हे यश संपादन केले.
रोहा तालुका कबड्डी इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने या स्तरावर पदक मिळवल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. या विजयामुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून भविष्यात राज्यस्तरावरही झेप घेण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फोटो कॅप्शन : कब्बडी स्पर्धेत विजेता संघाला बक्षीस देताना मान्यवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

