रोह्यात छोटे वैज्ञानिक समस्या परिहार स्पर्धा

रोह्यात छोटे वैज्ञानिक समस्या परिहार स्पर्धा

Published on

रोह्यात छोटे वैज्ञानिक समस्या परिहार स्पर्धा
रोहा, ता. २४ (बातमीदार) : कृतीतून विज्ञान आणि विज्ञानातून उपाय या संकल्पनेवर आधारित छोटे सायंटिस्टस् समस्या परिहार स्पर्धा रोहा येथील भाटे वाचनालयात उत्साहात संपन्न झाली. ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे आणि के.पी.आय.टी. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील १९ शाळांमधील आठवी-नववीच्या १५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन डाएट प्रतिनिधी मानसी कदम, अंशुल कंपनीचे मॅनेजर किशोर तावडे, जेष्ठ शिक्षिका मुग्धा ओक व प्रकल्प प्रमुख ओंकार बाणाईत यांच्या हस्ते झाले. गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रसाद दगडे व प्रसाद भोईर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले. प्रकल्प प्रमुख पूर्वा धोकटे, ओंकार बाणाईत व अंजली कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे संयोजन तेजल नवशे व स्वप्नाली आकलेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी विज्ञानाधारित उपाय सादर करत उपक्रमाचा आनंद लुटला.

फोटो कॅप्शन : कृतीतून विज्ञान आणि विज्ञानातून उपाय छोटे सायंटिस्ट्स समस्या परिहार स्पर्धेत विद्यार्थ्यांना सन्मानित करताना मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com