रोह्यात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
रोह्यात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
परीट समाजाचा सामाजिक उपक्रम; प्रात्यक्षिकांतून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रोहा अष्टमी येथील संत गाडगे महाराज मंदिरात संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परीट समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी युक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पराग व लीना भालेकर यांनी अन्नदान केले, तर वर्षभर पूजा-अर्चा करणाऱ्या प्रविणा व प्रविण सुर्वे यांचा सन्मान करण्यात आला.
जयंतीनिमित्त आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा प्रधान सचिव अमित निंबाळकर यांनी प्रात्यक्षिकांद्वारे तथाकथित चमत्कारामागील वैज्ञानिक सत्य उलगडले. अनिस कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमातून संत गाडगे महाराजांच्या स्वच्छता, समता व वैज्ञानिक विचारांचा संदेश देण्यात आला.
चौकट
वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित
अंधश्रद्धेमुळे समाजाची होणारी दिशाभूल रोखण्यासाठी वैज्ञानिक विचारसरणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांमध्ये जनजागृती होऊन अंधश्रद्धेला बळी न पडण्याचा संकल्प करण्यात आला.
फोटो कॅप्शन : संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शन करताना मान्यवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

