मोखाडा-त्र्यंबकेश्वर प्रवासात धोका

मोखाडा-त्र्यंबकेश्वर प्रवासात धोका

Published on

मोखाडा-त्र्यंबकेश्वर प्रवासात धोका
कास पुलाजवळ महामार्ग खचल्याने वाहनांना दणका
मोखाडा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू- जव्हार- मोखाडा- त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर पोशेरा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर कास पुलाजवळ डांबरी रस्ता खचल्याने वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील रस्त्याचा भाग खाली बसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
गुजरात- महाराष्ट्र तसेच नाशिकच्या औद्योगिक वसाहतीला जोडणारा मार्ग असल्याने प्रवासी तसेच मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. अशातच रस्त्याचा पृष्ठभाग असमतोल झाल्याने वेगाने येणारी वाहने अचानक उसळी घेत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर चारचाकी वाहने जोरात आदळत असल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
-----------------------------
सूचनाफलकाची गरज
रस्त्याच्या गंभीर स्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात या ठिकाणची अवस्था अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच धोकादायक भागात सूचनाफलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com