पालघरमध्ये कॉल सेंटरचा पर्दाफार्ष

पालघरमध्ये कॉल सेंटरचा पर्दाफार्ष

Published on

पालघरमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश
पाच जणांना अटक; सायबर फसवणुकीचा संशय

पालघर, ता. २४ : पालघर शहरालगत सुंदरम शाळेजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या बेकायदा कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. २४) छापा टाकत रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे पाच लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पालघर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. सुंदरम परिसरातील ‘फिया एकांत’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत हे कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणाहून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करीत आर्थिक व सायबर फसवणूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी सदनिकेत पाच जण लॅपटॉप व मोबाईलद्वारे संपर्क साधत असल्याचे आढळले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भरत लालवानी (मिरा रोड), रोहित निंबाळकर (नायगाव), रोहित झोरे (मिरा रोड), अमरदीप गिल (भाईंदर) आणि सागर पाठोडिया (सुरत) यांचा समावेश आहे. चौकशीत हा बेकायदा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. घटनास्थळावरून चार ते पाच लॅपटॉप आणि १२ मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले. पाचही आरोपींना न्यायालयाने शनिवार (ता. २८) फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशी केली जात होती फसवणूक...
आरोपी अमेरिकन नागरिकांची बेकायदा माहिती मिळवून त्यांना संपर्क करीत होते. स्वतःला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून मोबाईल हॅक झाल्याची भीती दाखवत गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडले जात होते. त्यानंतर त्या गिफ्ट कार्डमधील रक्कम परावर्तित करून रोख स्वरूपात मिळवली जात होती. या प्रकरणात किती नागरिकांची फसवणूक झाली याचा तपास सुरू असून, अधिक माहिती चौकशीनंतर समोर येणार आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com