पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : दिघा रेल्वे स्थानक परिसरात जुन्या वादातून दोन गटांतील तरुणांनी दगड, लाकडी दांडके आणि धारदार कोयत्याने एकमेकांवर जीवघेणे हल्ले केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन्ही गटांतील चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील काही तरुणांना अटक केली आहे. या घटनेमुळे दिघा परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
दिघा येथील अमितकुमार ऊर्फ सनी गौड (२२) याच्या तक्रारीनुसार, दिघा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (ता. २२) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शाहरूख खान, प्रीतम, अली मोहम्मद शेख, यश शेळके आणि इतर १० ते १२ जणांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून करण शिंगे याला बांबूने मारहाण केली, तर अली शेखने संजय राणा याच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत सनी, करण व संजय हे तिघे जखमी झाले आहेत.
गणेश डोहरे याच्यावर करण शिंगे, सनी गौड, सूरज यादव, ओंकार बापकर आणि इतर आठ ते नऊ जणांनी वार करून त्याला गंभीर जखमी केले. दोन्ही गटांतील ही हाणामारीची घटना रविवारी (ता. २२) रात्री आणि सोमवारी (ता. २३) पहाटेच्या सुमारास दिघा रेल्वे स्थानकाजवळील भागात घडली. पूर्ववैमनस्यातून दोन गट आमनेसामने आले. रागाच्या भरात दोन्ही गटांनी बेकायदा जमाव जमवून एकमेकांवर हल्ला चढवला. या हाणामारीत दगड, सिमेंट पत्र्याचे तुकडे आणि लोखंडी कोयत्याचा वापर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

