कढीपत्त्याची फोडणी ४०० रुपयांवर
कढीपत्त्याची फोडणी ४०० रुपयांवर
दक्षिणेकडील उत्पादन घटल्याने एपीएमसीत आवक निम्म्यावर; सर्वसामान्यांच्या ताटातून कढीपत्ता गायब
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : स्वयंपाकातील फोडणीचा अविभाज्य भाग असलेला कढीपत्ता यंदा महागाईच्या विळख्यात सापडला असून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात त्याचे दर २०० ते ४०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. पूर्वी कोथिंबिरीसोबत मोफत किंवा अत्यल्प दरात मिळणारा कढीपत्ता आता सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लावत आहे.
देशातील कढीपत्त्याचे मुख्य उत्पादन आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांत होते. यंदा प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच दर्जा खालावल्याने वाहतुकीदरम्यान माल खराब होऊन बाजारात येणारी आवक निम्म्याहून कमी झाली आहे. पूर्वी दररोज ८ ते १० टन आवक होत असताना सध्या केवळ सुमारे १८ हजार किलो माल बाजारात येत आहे.
दरवाढीमुळे किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी कमी केली असून कोथिंबिरीसोबत कढीपत्ता फुकट देण्याची प्रथा जवळपास बंद झाली आहे. परिणामी पोहे, उपमा व फोडणीतील कढीपत्त्याचा वापरही कमी होत असून स्वयंपाकघराचा खर्च वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

