सोशल मीडियातून ओळखीतून तरुणीवर अत्याचार!
समाजमाध्यमांवरील ओळखीने घात
बदलापुरातील तरुणीची आर्थिक फसवणूक; गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचाही आरोप
बदलापूर ता. २४ (बातमीदार) : समाजमाध्यमातून मैत्री करून तरुणीची आर्थिक फसवणूक आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात पंकज शैलेंद्र कुमार (२५, रा. नोएडा, दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीची आरोपी पंकजशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्याने एका मार्केटिंग कंपनीत सदस्यत्व देण्याचे प्रलोभन दाखवून तरुणीकडून २५ हजार रुपये उकळले. आर्थिक व्यवहार झाल्यानंतर आरोपी पीडित तरुणीच्या बदलापुरातील निवासस्थानी आला. २२ फेब्रुवारीला रात्री आरोपीने तरुणीला मद्य व मादक पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. पीडितेने विरोध केला असता, त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चॅट मार्केटिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचेही समोर आले आहे.
पोलिस कारवाई
बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील ओळखी, आर्थिक व्यवहार आणि हा गुन्हा याचा सखोल तपास केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आणि आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

