ते १९ मंजूर ठराव रद्द करा; भाजपची मागणी

ते १९ मंजूर ठराव रद्द करा; भाजपची मागणी

Published on

ते १९ मंजूर ठराव रद्द करा; भाजपची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे पालिकेची सोमवारी (ता. २३) सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत पटलावर असलेल्या विषयपत्रिकेवर कोणतीही चर्चा करण्यात न आल्याने सभागृहात एकच गदारोळ उडाला होता. या गदरोळात विषयपत्रिकेवरील सर्व १९ ठराव मंजूर करण्यात आले. हे मंजूर ठराव रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना पाठवले आहे.
ठाणे पालिकेवर मागील तीन वर्षांपासून असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर सोमवारी झालेल्या पहिल्याच महासभेत प्रश्न उत्तरे आणि लक्षवेधीवर चर्चा न झाल्याने सत्तेत असलेल्या भाजपसह शरद पवार गट आक्रमक झाले होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता, याच गोंधळाचा फायदा घेत अवघ्या १० मिनिटांत पटलावर असलेले १९ विषय कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर करण्यात आले होते. त्यावरून भाजपचे लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, महापौरांना पाठवलेल्या पत्रात भाजपने म्हटले आहे की, महासभेत अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच नगरसेविकांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचना आणि प्रश्न सभागृहाच्या पटलावर न घेताच डावलण्यात आले. ही बाब सभाशास्त्राला धरून नसून लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, महासभेसारख्या सर्वोच्च सभागृहात विषयांवर सखोल चर्चा होणे अपेक्षित असताना, गोंधळाचा फायदा घेऊन ठराव मंजूर करणे हे चुकीचे असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे या सभेत मंजूर झालेले सर्व १९ ठराव रद्द करून ते पुन्हा चर्चेसाठी महासभेसमोर मांडावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. या प्रकरणावर महापौर आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com