लॉजिस्टिक पार्कमधील अतिक्रमणावर सिडकोचा हातोडा

लॉजिस्टिक पार्कमधील अतिक्रमणावर सिडकोचा हातोडा

Published on

लॉजिस्टिक पार्कमधील अतिक्रमणावर सिडकोचा हातोडा
११ हजार चौ. मीटर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; धडक कारवाईत भूमाफियांना इशारा
नवी मुंबई, ता. २४ (बातमीदार) : सिडको प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत लॉजिस्टिक पार्क नोडमधील मौजे गावठाण, सर्व्हे क्रमांक १६ येथील सुमारे ११,०८५ चौ. मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणावर धडक कारवाई केली. सिडकोच्या अधिसूचित व संपादित जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता पार्किंग, पत्रा शेड तसेच सुरक्षा केबिन उभारण्यात आले होते. नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास येताच मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत सिडको पोलीस पथक, स्थानिक पोलिस, सिडको सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान, महावितरणचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. एक जेसीबी, एक ट्रक, दोन जीप आणि पाच मजुरांच्या सहाय्याने काही तासांतच अतिक्रमण हटवण्यात आले. सिडकोच्या संपादित जमिनींवर विनापरवाना बांधकाम करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे.

चौकट
संपादित जमिनींच्या संरक्षणासाठी कठोर भूमिका
सार्वजनिक सोयीसुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडांवर होत असलेली बेकायदेशीर अतिक्रमणे शहराच्या नियोजनाला मोठा धोका ठरत आहेत. लॉजिस्टिक पार्कसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अनधिकृत बांधकामे वाढल्यास पायाभूत सुविधा उभारणीवर परिणाम होतो. त्यामुळे अशा कारवायांद्वारे संपादित जमिनींचे संरक्षण करणे, भूमाफियांना आळा घालणे आणि भविष्यातील विकास प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध ठेवणे हा सिडकोचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. भविष्यातही शहरातील विविध भागांत अशाच धडक मोहिमा राबविण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com