जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीकडून शाळा स्कूल मालकांची झाडा झाडती
ठाणे जिल्ह्यात स्कूल बससाठी कठोर नियमावली
चालकांची आता ब्रेथ अॅनालायझरद्वारे रोज तपासणी
ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) ः बदलापूरात शाळेत जाणाऱ्या बालिकांवर लैंगिक अत्याचारच्या घटना घडल्यानंतर बस वाहतूक यंत्रणा ठाणे पोलिस आणि वाहतूक विभागाकडून रडारवर आली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीने आता शाळा, बस चालक आणि मालकांसाठी नियमावली दिली आहे. शाळा आणि स्कूल बस मालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची अंमलबजावणी वाहतूक विभाग करणार आहे.
जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची त्रैमासिक बैठक मंगळवारी (ता. २४) तीनहात नाका येथील ठाणे शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अपघातमुक्त प्रवासाचे निर्देश देण्यात आले. पंकज शिरसाट रोहित काटकर, आशुतोष बारकुल यांनी विविध सुरक्षाविषयक निर्देश दिले. या बैठकीस टीएमटी व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, केडीएमटी व्यवस्थापक, स्कूल बस चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आणि एमएसआरटीसीचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत करण्यात आलेल्या सूचना
प्रत्येक शालेय वाहनांवर डॅशकॅम बसवावेत, जेणेकरून अपघात टाळण्यासह अपघात किंवा नियमभंग झाल्यास नेमकी चू
क कोणाची हे स्पष्ट होण्यास मदत होईल. शाळा भरण्यापूर्वी व सुटण्यापूर्वी अर्धा तास आधीच बसेस शाळेजवळ उभ्या कराव्यात. शालेय वाहनांच्या मालकांनी नियमितपणे चालकांशी संवाद साधावा.
प्रशिक्षण बंधनकारक
सर्व चालक व अटेंडंट यांना रस्ता सुरक्षा प्रशिक्षणासाठी पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व शालेय बसमध्ये बसविलेल्या ब्रेथ एनालायझर मशिनद्वारे दररोज प्रतिबंधात्मक (प्रीव्हेंटिव्ह) तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सीएनजीवर चालणाऱ्या शालेय बसच्या टँकची दर तीन वर्षांनी अनिवार्य तपासणी करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलिस आणि अन्य प्राधिकरणे व प्रशासन, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन, बस मालक व चालक यांनी समन्वयाने काम केल्यास शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व निर्धास्त होईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामुहिक प्रयत्नांची शर्थ केली जाईल.
- पंकज शिरसाट, उप आयुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

