मुलांच्या खेळावरून दोन गटात थरार; चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
मुलांच्या खेळावरून दोन गटांत थरार
चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी
बोळिंज, ता. २४ (बातमीदार) ः वसईच्या वालीव परिसरात मुलांच्या खेळण्यावरून आज झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खान कॉम्प्लेक्स परिसरात लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन गटांत किरकोळ वाद सुरू झाला. नंतर या वादाने काही वेळात रौद्र रूप धारण केले आणि दोन्ही गट एकमेकांवर धावून आले. या घटनेत अब्दुल रहमान खान या व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला. चाकूहल्ल्यात अब्दुल रहमान खान गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वालीव पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिस व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

