दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई

दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई

Published on

करवसुलीतील हलगर्जीमुळे दोन लिपिकांचे निलंबन
डोंबिवली, ता. २४ : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या ९-आय प्रभागातील दोन लिपिकांवर मंगळवारी (ता. २४) महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची कारवाई केली. अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत.
मालमत्ता करवसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुक्त स्वतः विविध प्रभागांमध्ये जाऊन आढावा घेत आहेत. त्यांनी ९-आय आणि १०-इ प्रभागांना प्रत्यक्ष भेट देऊन सहाय्यक आयुक्त, कर अधीक्षक आणि लिपिकांसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत करवसुलीची सद्य:स्थिती तपासली असता, ९-आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील यांच्याकडून अत्यंत कमी प्रमाणात वसुली झाल्याचे समोर आले. कामातील ही निष्काळजी लक्षात घेत आयुक्तांनी या दोन्ही लिपिकांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक गांभीर्याने काम करावे, असे सक्त निर्देशही या वेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com