व्यावसायिकाला ६५ लाखांचा गंडा

व्यावसायिकाला ६५ लाखांचा गंडा
Published on

मुंबई ः मंत्र्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे भासवणाऱ्या एका भामट्याने आपल्याला नवी मुंबईतील टोल कंत्राट मिळणार आहे, असे अंधेरीत राहणाऱ्या वयोवृद्ध व्यावसायिकाला सांगितले. हा व्यवसाय भागीदारीत करण्याचे प्रलोभन दाखवत त्याला ६५ लाख रुपयांना फसवले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ८० वर्षीय वृद्धाने अंधेरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीच्या आधारे अरुण सिंग या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास हटकर असे तक्रारदार वृद्धाचे नाव असून ते. खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय सुरू केला होता. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com