१३ लाखांचा ‘एमडी’ जप्त

१३ लाखांचा ‘एमडी’ जप्त

Published on

प्रभादेवीत अमली पदार्थविरोधी कारवाई; १३ लाखांचा ‘एमडी’ जप्त
प्रभादेवी, ता. २४ : अमली पदार्थविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, सुमारे १३ लाख रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्‍या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने डोंगरी-पायधुनी परिसरात केली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला डोंगरी-पायधुनी परिसरात अमली पदार्थ विक्री करणारा सोहेल पटणी ऊर्फ ‘सट्टा’ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२६ला त्याचा साथीदार फिरोज अहमद मर्चंट याला डोंगरी परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत १३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com