अपघातात तरुणाचा मृत्यू
अपघातात तरुणाचा मृत्यू
मालाड, ता. २४ (बातमीदार) ः मालवणीतील मार्वे रोडवर आज (ता. २४) दुपारी घडलेल्या धक्कादायक अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनधिकृतपणे रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या लगेजच्या झाकणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास वसंत दुधेकर (३६) हे मालाडच्या दिशेने येत होते. मालवणीतील मार्वे रोडवर अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचे लगेजचे झाकण क्लीनरने अचानक उघडले. त्याचवेळी मागून येणारी दुचाकी त्या उघड्या झाकणावर जोरात आदळली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या मानेस गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला तत्काळ रिक्षामधून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

