राष्ट्रध्वजाच्या अपमानाप्रकरणी ८५ वर्षीय वृद्धाला दिलासा
८५ वर्षीय वृद्धाला दिलासा
राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी गुन्हा रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या ८५ वर्षीय वयोवृद्धाविरुद्धचा खटला उच्च न्यायालयाने रद्द केला. याचिकाकर्त्यांची उपस्थिती केवळ त्यांच्या निवासी सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात उपस्थित होता, असेही न्यायालयाने गुन्हा रद्दबातल करताना नमूद केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात तिरंगा उलटा फडकवण्यात आला. त्या समारंभात याचिकाकर्त्यांची फक्त उपस्थिती गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने नोंदवले. दाखल गुन्ह्यामध्ये याचिकाकर्ते समारंभात उपस्थित असल्याचा आरोप आहे. तसेच अर्जदाराचे कोणतेही कृत्य राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा अपमान करण्यासाठी किंवा त्याचा अनादर करण्यासाठी केल्याचे दर्शविणारी कोणतीही सामग्री रेकॉर्डवर नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ध्वजाचा अनादर करण्याचा गुन्हा करण्यासाठी हे कृत्य जाणूनबुजून करणे आवश्यक आहे. त्यामुळे तिरंगा फडकवण्याच्या ठिकाणी आरोपीची केवळ उपस्थिती राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असेही न्यायालयाने गुन्हा रद्द करताना अधोरेखित केले.
काय प्रकरण?
तक्रारीनुसार जानेवारी २०१७मध्ये आरोपीसह अन्य रहिवासी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी गृहनिर्माण संस्थेत जमले होते. संध्याकाळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना तिरंगा उलटा फडकवल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि सोसायटीतील इतर पाच रहिवाशांविरुद्ध राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियम कायद्याच्या तरतुदींनुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आपण ज्येष्ठ नागरिक असून, वयोमानानुसार विविध आजारांनी ग्रासले आहे. आपण ध्वजवंदनाच्या समारंभाला उपस्थित होतो. तसेच ज्या गृहनिर्माण संस्थेचा ध्वज फडकवण्यात आला होता त्याचा सार्वजनिक जागेच्या क्षेत्रात येत नसल्याचा दावाही ज्येष्ठ नागरिकाकडून याचिकेत करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

