डोंबिवलीत प्रेमप्रकरणातून डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

डोंबिवलीत प्रेमप्रकरणातून डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

Published on

डोंबिवलीत प्रेमप्रकरणातून डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल
बियर, ४५ झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः डोंबिवली शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयातील बड्या डॉक्टरने प्रेमप्रकरणातून नैराश्येत जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २४) उघडकीस आली आहे. त्याच्या रुग्णालयातील एका नर्सने बोलणे बंद केल्याच्या मानसिक तणावातून डॉक्टरने बियरसोबत तब्बल ४५ झोपेच्या गोळ्या घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. वेळेवर उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, डोंबिवलीत त्यांची स्वतःची दोन नामांकित हॉस्पिटल आहेत. काही काळापासून डॉक्टरचे त्यांच्याच रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.

घरगुती वाद वाढल्याने डॉक्टरांनी डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत स्वतंत्र घर घेतले आणि तेथे राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नाचा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र लग्नासाठी डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर नर्सने त्यांच्याशी पूर्णपणे बोलणे बंद केले. ज्या नर्ससाठी त्यांनी कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला तिनेच अबोला धरल्याने डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचले. या नैराश्यातूनच त्यांनी राहत्या घरी रात्री बियरसोबत ४५ झोपेच्या गोळ्या घेतल्या. आज सकाळी डॉक्टर वेळेवर रुग्णालयात न आल्याने संशय निर्माण झाला. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com