एकाच घरातील तीन मोबाईल एकाच वेळेस चोरीला

एकाच घरातील तीन मोबाईल एकाच वेळेस चोरीला

Published on

एकाच घरातील तीन मोबाईल चोरीला

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : घरातील हॉलमध्ये मोबाईल ठेवून झोपी गेलेल्या दिवा पूर्व येथील सायगावकर यांच्या घरातील तीन मोबाईल फोन एकाच वेळेस चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने घराच्या अर्धवट उघड्या खिडकीतून घरात प्रवेश करून सुमारे ४६ हजार रुपये किमतीचे मोबाईल लांबवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संजना नंदकुमार सायगावकर (वय २३) या दिवा पूर्व स्थानक रोड परिसरात राहणाऱ्या आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता कुटुंबीयांनी घरातील हॉलमध्ये मोबाईल ठेवून झोपी गेले. मात्र, पहाटे सुमारे ३.३० वाजता तक्रारदार यांचे वडील जागे झाल्यानंतर त्यांना त्यांचा मोबाईल जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पाहणी केली असता तक्रारदार तसेच त्यांच्या आईचा मोबाईलही दिसून आला नाही. दरम्यान, घराची पाहणी केली असता हॉलमधील खिडकी अर्धवट उघडी असल्याचे दिसून आले. त्यानुसार चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करून कुटुंबीयांच्या नकळत मोबाईल चोरी केल्याचा संशय तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या तीन मोबाईलची किंमत ४६ हजार रुपये आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com