मुंबई
महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिलादिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कल्याण (वार्ताहर) ः ८ मार्चच्या जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरिता पालिका कार्यक्षेत्रातील सर्व महिलांनी आपण केलेल्या कामगिरीबाबतची संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्जासहित महिला व बालकल्याण विभाग येथे शुक्रवारी (ता. २७)पर्यंत जमा करण्याचे आवाहन उपायुक्त कांचन गायकवाड यांनी केले आहे.

