केडीएमसी कचरा कंत्राटदार पुन्हा वादात

केडीएमसी कचरा कंत्राटदार पुन्हा वादात

Published on

कचरा कंत्राटदार पुन्हा वादात
सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे कर्मचारी गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट असलेल्या सुमीत एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जी केल्याचा आरोप होत असून, त्यातून कंत्राटी कर्मचारी काशीनाथ पारवे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोड स्वीपिंग मशीन साफ करत असताना संबंधित कर्मचाऱ्याचा पाय घसरला. त्या वेळी मशीनच्या सायलेन्सरवर पडल्याने तो गंभीररीत्या भाजला. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेनंतर एक खासगी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य, हातमोजे, सुरक्षात्मक बूट, उष्णतारोधक कपडे यांसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभावामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा संघटनेने केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, केवळ निवेदन देऊन भागणार नाही. तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी सुमीत एल्कोप्लास्ट कंपनीकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com