कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी

कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी

Published on

गोविंदवाडी परिसराची महापौरांकडून पाहणी
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी मंगळवारी (ता. २४) पाहणी केली आणि तेथील रहिवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी या वेळी परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. गोविंदवाडी परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबत असल्याबाबत पालिका सदस्या समीना शेख यांनी केलेल्या तक्रारीवरून तेथील मलनिस्सारण व्यवस्थेचीदेखील त्यांनी पाहणी केली आणि तक्रारीचे निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. या वेळी नवनिर्वाचित महापौरांचा सत्कार करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता आधी तुमची कामे होऊ द्यात, नंतर सत्कार करा, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com