भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी

Published on

कल्याणमध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव
ठोस उपाययोजनेसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव आता जीवघेणा ठरू लागला आहे. भटक्या श्वानांच्या दहशतीमुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी कल्याण (पूर्व) येथील आयेश अमीन या तरुणाला भटक्या श्वानाने चावा घेतला होता. या घटनेनंतर रेबीज संसर्गाच्या भीतीपोटी मानसिक तणावातून या तरुणाने आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर महापालिका रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे. राहुल काटकर यांनी निदर्शनास आणून दिले, की महापालिका रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा आहे.

वेळेवर उपचार आणि लसीकरण न मिळाल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाचे काम नियोजनशून्य असून अधिकाऱ्यांची निष्काळजी याला कारणीभूत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काटकर यांनी पत्राद्वारे परिसरात तत्काळ विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात यावी, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यात यावी, लस तुटवड्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

जनजागृती कर
नागरिकांमध्ये भीती घालवण्यासाठी आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहीम राबवावी, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ त्रासाचा नसून तो आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राहुल काटकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com