सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या

सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या

Published on

सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या
कारवाईची नागरिकांची मागणी
खारघर, ता. २४ (बातमीदार) : खारघरमध्ये होणाऱ्या “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने अलीकडे विविध ठिकाणी मोहीम राबवत बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. मात्र सेक्टर ३५ डी येथील प्लॉट क्रमांक ३४ व ५४ या सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या झोपड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या ठिकाणी दिवसेंदिवस झोपड्यांची संख्या वाढत असून स्थानिक रहिवाशांनी याबाबत सिडको तसेच पनवेल महानगरपालिकाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिसरात कचरा टाकणे, उघड्यावर शौच तसेच वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास वाढला आहे.
दरम्यान, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे या झोपड्यांमुळे मोकळ्या भूखंडाचा नियोजित विकास रखडला असून भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करून भूखंड मोकळा करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com