अंबाडी-झिडके येथे कुणबी वधू-वर परिचय मेळावा

अंबाडी-झिडके येथे कुणबी वधू-वर परिचय मेळावा

Published on

वज्रेश्वरी, ता. २५ (बातमीदार) : कुणबी समाज सेवा संस्था ठाणे-पालघर ग्रामीण यांच्या वतीने अंबाडी-झिडके येथील रेणुका विद्यालयात कुणबी वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक वधू-वर आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
संस्थेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील यांनी, आंतरजातीय विवाह आणि ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार रोखण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने असे मेळावे घेतले जात आहेत. आतापर्यंत ३२७५ वधू-वरांनी विवाहासाठी संस्थेकडे नोंदणी केल्याचे सांगितले. मेळाव्याला कल्याण बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, शहापूर बाजार समितीचे संचालक अनिल निचिते, शहापूर कुणबी संघाचे अध्यक्ष नंदकुमार मोगरे, उद्योजक रवींद्र पाटील, भिवंडी कुणबी सेनेचे अध्यक्ष भगवान सांबरे तसेच भिवंडी कुणबी शहर अध्यक्ष संजय भेरे यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव शामराव कोरडे, उपाध्यक्ष दत्तात्रय पठारे, कार्याध्यक्ष चंद्रकांत लाटे, खजिनदार व सदस्य राजाराम भोईर, छगन म्हसकर, विद्या पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी उपस्थित पालक व वधू-वरांना समाजातील अनिष्ट रूढींवर कसा आळा घालता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com