तळोजा एमआयडीसीतील उग्र वायूने नागरिक त्रस्त
तळोजा एमआयडीसीतील उग्र वायूने नागरिक त्रस्त
तातडीच्या कारवाईची मागणी
खारघर, ता. २५ (बातमीदार) : तळोजा एमआयडीसी परिसरातून रात्रीच्या वेळी हवेत सोडल्या जाणाऱ्या रसायनांच्या उग्र वासामुळे खारघर, तळोजा, नावडे व रोडपाली येथील नागरिक हैराण झाले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या वायू प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास, दमा व अस्थमा यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फटका बसत आहे. यापूर्वीही रोडपाली सिटीझन फोरम व खारघरमधील रहिवाशांनी मूक मोर्चा काढत प्रदूषणाविरोधात निषेध नोंदवून निवेदन दिले होते. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मंगळवार व बुधवारी मध्यरात्री पुन्हा तीव्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरांची दारे-खिडक्या बंद करून राहावे लागले. यासंदर्भात क्षेत्रीय अधिकारी विक्रांत भालेराव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चौकट
आरोग्यावर गंभीर परिणाम
“पहाटे घराबाहेर पडताना भीती वाटते. हा प्रकार काही दिवसांपासून सुरू असून, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी खारघर येथील रहिवासी किरणकुमार रावराणे यांनी केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने वायू गुणवत्तेचे परीक्षण करून दोषी उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

